शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने व दोन घरे जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

- शांती जयस्वाल (70), मौजिलाल जयस्वाल (50) या ज्येष्ठ नागरिकांना वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

घाटकोपर : उपनगरातील कुर्ला टर्मिनस भागातील साबळेनगर परिसरात काल (मंगळवार) मध्यरात्री 3:30 च्या सुमारास आग लागून पाच दुकाने व दोन घरे जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

शांती जयस्वाल (70), मौजिलाल जयस्वाल (50) या ज्येष्ठ नागरिकांना वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत 12 ते 15 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन दुकानात काही कामगार झोपेत असताना आगीच्या धुराचा वास येत असल्याचे त्यांना जाणवले. या दोन्ही कामगारांनी वेळीच बाहेर धूम ठोकल्याने त्यांचा जीव वाचला.

यामध्ये मोहन शेट्टी, अंजली शेट्टी, नानेलाल जयस्वाल, रमेश जयस्वाल, अब्रिन खान यांची दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व पोलिसांनी धाव घेतली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five shops and two houses burned down due to short circuit

टॅग्स