Five thousand unauthorized constructions in Kalyan Dombivali municipal area
Five thousand unauthorized constructions in Kalyan Dombivali municipal area

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात पाच हजार अनधिकृत बांधकामे 

कल्याण : मागील बारा वर्षात कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रत्येक वर्षी सरासरी पाच हजार अनधिकृत बांधकामे उभी राहात असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. 2007 मध्ये अग्यार समितीसमोर चौकशीदरम्यान आलेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात 67000 इतकी अनधिकृत बांधकामे होती. 31 मार्च 2019 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात एक लाख 21 हजार अनधिकृत बांधकामे आहेत. याचाच अर्थ मागील बारा वर्षाच्या काळात साधारण 60 हजार बांधकामे उभी राहिली आहेत.

राज्य सरकार अनधिकृत बांधकामांबाबत कडक भूमिका घेण्याचे आदेश देत असतानाही पालिका क्षेत्रात उभ्या राहिलेल्या या अनधिकृत बांधकामांवर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.  

पालिका क्षेत्रात होत असलेल्या या बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे या आकडेवारी वरून स्पष्ट होते. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात आज एकूण दोन लाख साठ हजारापेक्षा जास्त बांधकामे आहेत. या सर्व बांधकामांवर पालिकेने मालमत्ता कराची आकारणी केली आहे. अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाईस बाधा न येता असा शिक्का मारून पालिकेने यापैकी एक लाख एकवीस हजार बांधकामांची करवसुली केली आहे. परंतु या बांधकामांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पालिका प्रशासना समोर अनेक अडचणी येत असल्याचे कारण प्रशासन कायमच देत आले आहे. परंतु ही बांधकामे सुरू असताना याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर आजपर्यंत पालिका प्रशासनाने काही कारवाई केली का? या प्रश्नाचे उत्तर पालिकेकडे नाही. 

अधिकृत बांधकामांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका प्रशासनाच्या नियोजनाचे तीन तेरा वाजत आहेत. रस्ते, पाणी, सार्वजनिक आरोग्य, शहर स्वच्छता या प्राथमिक सोयी सुविधा पुरवताना पालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. या सर्वाचे मूळ अनधिकृत बांधकामांमध्ये आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com