ग्राहकांसोबत इथे सुरु होता 'गंदा' धंदा..

ग्राहकांसोबत इथे सुरु होता 'गंदा' धंदा..

नवी मुंबई  : मसाज पार्लरच्या नावाखाली ग्राहकांसोबत अश्‍लील चाळे करून, अनैतिक धंदे करणाऱ्या खारघर सेक्‍टर-3 मधील 'शगुन स्पा ऍण्ड मसाज सेंटर'वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक युनिटने छापा मारून स्पाच्या व्यवस्थापकासह 5 महिलांना अटक केली.

खारघर सेक्‍टर-3 येथील बेलपाडा गावात सुरू असलेल्या शगुन स्पा ऍण्ड मसाज सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून अतिरिक्त सेवेच्या नावाखाली बीभत्स आणि अश्‍लील चाळे करण्यात येत असल्याची माहिती मानवी वाहतूक प्रतिबंधक युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने खारघरमधील शगुन स्पा ऍण्ड मसाज सेंटरमध्ये सोमवारी (ता.18) सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली.

या वेळी या स्पामध्ये कामास असलेल्या महिलांकडून अतिरिक्त सेवेच्या नावाखाली अधिकचे पैसे घेऊन ग्राहकांसोबत अश्‍लील व बीभत्स चाळे करण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांच्या पथकाने या मसाज पार्लरवर छापा मारला. या वेळी पोलिसांनी व्यवस्थापकासह 5 महिलांवर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून, या सर्वांना अटक केली.  

WebTitle : five women arrested from kharghar massage spa for doing immoral activities

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com