पळून जाऊन लग्न केलेल्या प्रेमी युगुलाला दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

मुंबई - अल्पवयीन असताना प्रियकराबरोबर पळून गेलेल्या तरुणीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिने केलेले लग्न मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवून तिच्या प्रियकराविरुद्धची फौजदारी तक्रार रद्द केली आहे. 

या मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराविरोधात तक्रार नोंदवली होती. मुलाने फूस लावून आपल्या मुलीला पळवून नेले, असे तक्रारीत म्हटले होते. तक्रार रद्द करण्यासाठी मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माझे वय 17 वर्ष नऊ महिने असताना मी माझ्या मर्जीने मित्राबरोबर गेले होते. आपण एका महिना नातेवाइकाच्या घरी राहत होतो आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावरच रीतसर विवाह केला, असेही तिने न्यायालयाला सांगितले. लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्रही तिने न्यायालयात दाखल केले. 

मुलीच्या जबाबामुळे न्यायालयाने तिच्या पळून जाण्याचा मुद्दा गौण ठरवून तिने सज्ञान झाल्यानंतर लग्न केल्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरवला. आपण पतीसोबत राहणार असल्याचे तिने न्यायालयात स्पष्ट केल्याने तिचा जबाब मान्य करून न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने मुलाविरोधात दाखल केलेली फिर्याद रद्द करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. 

Web Title: Flee into the comfort lover marriage