फ्लेमिंगो अभयारण्याचे आज ऐरोलीत उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - फ्लेमिंगोंचे थवे उतरलेल्या मुंबईजवळच्या ऐरोलीतील फ्लेमिंगो अभयारण्याचे रविवारी (ता. 30) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. वाशी-ऐरोली भागात फ्लेमिंगोंना पाहण्याची केवळ एका महिन्याची संधी पर्यटकांकडे आहे. पावसाचे आगमन होताच मुंबई भेटीला आलेले फ्लेमिंगो आपल्या मूळ ठिकाणी कच्छला निघून जातील.

उद्‌घाटनाच्या निमित्ताने "वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (डब्ल्यूडब्ल्यूआय) तज्ज्ञांनी लिहिलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य सर्वेक्षणाचेही उद्‌घाटन होणार आहे. फ्लेमिंगो अभयारण्यातील जैववैविध्य, भौगोलिक परिस्थिती यासह अभयारण्यातील अतिसंरक्षित भागांत वाढणाऱ्या जलप्रदूषणाबाबत यात माहिती देण्यात आली आहे.

येथील जैववैविध्य केंद्रात राज्यातील जलचर प्राण्यांची माहिती मिळेल. बोटीतून फ्लेमिंगोंना जवळून पाहायची संधी आठवड्यानंतर मिळू लागेल, अशी माहिती कांदळवन वन विभागाचे उपवनसंरक्षक मकरंद घोडके यांनी दिली.

Web Title: flemingo sanctuary opening