'नवाब मलिक तुम्ही मुस्लिम आहात ना, मग...' फ्लेचर पटेल यांचं सडेतोड उत्तर

"पुर्वी लहान मुलांना घाबरवण्यासाठी 'सो जा गब्बर आ जायेगा' असा डॉयलॉग ऐकवला जायचा. आता..."
nawab malik
nawab malikesakal

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (ncp) आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला. एनसीबीने केलेल्या कारवाईच्यावेळी फ्लेचर पटेल (fletcher patel) तिथे पंच म्हणून कसे उपस्थित असतात? त्यांच्या कुटुंबाशी समीर वानखेडेंचा (sameer wankhede) काय संबंध आहे? असे प्रश्न नवाब मलिक यांनी विचारले आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या छापेमारीच्या कारवाईच्यावेळी पंच म्हणून फ्लेचर पटेल यांच्या उपस्थितीची काही उद्हारणे दिली.

या सर्व आरोपांवर आता फ्लेचर पटेल यांनी समोर येऊन संवाद साधला आहे. "एनसीबीला माझी गरज लागते, तेव्हा मी तिथे असतो. मुंबई पोलिसांसारखी एनसीबीकडे मोठी टीम नाहीय. नवाब मलिक यांच्या भागातही एनसीबीने छापेमारीची कारवाई केली आहे. नवाब मलिक तुम्ही एनसीबीच्या मागे का उभे राहत नाही?" असा सवाल फ्लेचर पटेल यांनी विचारला आहे.

nawab malik
अजितदादा, जयंत पाटील, अन् मला सिनेमात काम द्या - गिरीश महाजन

"माझे कौटुंबिक फोटो जाहीर करण्यामागे तुमचा हेतू काय आहे? तुम्ही मुस्लिम आहात ना, मग महिलांचे फोटो तुम्ही सोशल मीडियावर कसे काय जाहीर करु शकता? माझी बहिण आहे ती" असे फ्लेचर पटेल म्हणाले. "मला वर्दी घालण्यासाठी प्रवृती करणारी व्यकी समीर वानखेडे आहे. त्यांचे वडिल पोलीस अधिकारी होते. त्यांचा समाजावरती चांगला प्रभाव आहे" असे वानखेडेंचे समर्थन करताना फ्लेचर म्हणाले.

nawab malik
चर्चमध्ये ब्रिटीश खासदाराला भोसकणं हे दहशतवादी कृत्य - यूके पोलीस

"पुर्वी लहान मुलांना घाबरवण्यासाठी 'सो जा गब्बर आ जायेगा' असा डॉयलॉग ऐकवला जायचा. आता तशीच ड्रग पेडलरमध्ये समीर वनाखेडेंच्या नावाची दहशत आहे" असे फ्लेचर म्हणाले. "समीर वानखेडे, एनसीबीच्या टीमला कुटुंब नाही का? त्यांचा सत्कार का नाही करत? ते काही चुकीचं काम करत आहेत का? त्यांच्याआधी कोणी असं काम केलं होतं का? त्यांच्या नजरेत सगळे समांतर आहेत. मग तो मंत्र्याचा मुलगा असो की, हिरोचा" असे फ्लेचर पटेल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com