उड्डाणासाठी सज्ज विमान मनोरुग्णामुळे थांबले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

उड्डाणासाठी तयार असलेल्या विमानासमोर अचानक एक मनोरुग्ण येऊन उभा राहिला आणि धावपट्टीवरच हे विमान थांबवण्याची वेळ आली.

मुंबई : उड्डाणासाठी तयार असलेल्या विमानासमोर अचानक एक मनोरुग्ण येऊन उभा राहिला आणि धावपट्टीवरच हे विमान थांबवण्याची वेळ आली. मुंबई विमानतळावर गुरुवारी (ता. २२) सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. सुरक्षाव्यवस्था भेदून मनोरुग्ण धावपट्टीपर्यंत पोहचलाच कसा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

स्पाइस जेटचे ‘एयसजी ६३४’ हे विमान गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई-बेंगळुरुसाठी उड्डाण करण्याच्या तयारीत तयारी होते; मात्र त्याचवेळी मुंबई विमानतळावरील धावपट्टी क्रमांक २७ वर एक अनोळखी व्यक्ती अचानक चक्क विमानासमोर येऊन उभी राहिली. त्यामुळे तातडीने विमान थांबवण्यात आले. त्यामुळे मुंबई विमानतळावर सुरक्षा पुरवणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पथकाने धावपट्टीवर धाव घेत त्याला ताब्यात घेतले; मात्र ‘सीआयएसएफ’च्या चौकशीत ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, विमानतळांवरील हवाई भाग, एअरप्लेस पार्किंग वे, टॅक्‍सी वे आणि धावपट्टी येथे कडक सुरक्षा असूनही हा मनोरुग्ण धावपट्टीपर्यंत पोहचल्याने विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flight delayed because of mental person