युरोपच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला ७३ फुटी तिरंगा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून युरोपमधील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर ७३ फुटी तिरंगा फडकवण्याची किमया एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्यांच्या ग्रुपने केली. त्यांनी आपल्या या माहिमेच्या माध्यमातून देशाला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून युरोपमधील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर ७३ फुटी तिरंगा फडकवण्याची किमया एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्यांच्या ग्रुपने केली. त्यांनी आपल्या या माहिमेच्या माध्यमातून देशाला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.

या मोहिमेत पुण्याचा दहा वर्षांचा साई कवडे याच्यासह नवी मुंबई पोलिस दलातील पोलिस शिपाई तुषार पवार, भूषण वेताळ (औरंगाबाद), सागर नलावडे (कोल्हापूर), आनंद बनसोडे (पुणे) हे सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या या विक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या मोहिमेतील साई कवडे हा एलब्रूस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरला. ३६० एक्‍सप्लोररमार्फत युरोपमधील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याच्या आयोजित मोहिमेमध्ये या ग्रुपने सहभाग घेतला होता. 

नवी मुंबई पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा 
या मोहिमेत नवी मुंबई पोलिस दलातील पोलिस शिपाई तुषार पवार हेही सहभागी आहेत. पोलिस शिपाई तुषार पवार यांनी युरोपमधील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकविण्याचा विक्रम केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flipped over Europe's highest peak 3 foot indian national flag