बॉलिवूड कलाकार मदतीची जाहीरात करत नाहीत - बिग बी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

बॉलिवूड कलाकार मदत करतात; पण त्याची जाहिरात करत नाहीत. त्यापैकी मी एक आहे, असे उद्‌गार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काढले.

मुंबई - बॉलिवूड कलाकार मदत करतात; पण त्याची जाहिरात करत नाहीत. त्यापैकी मी एक आहे, असे उद्‌गार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काढले.

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत; मात्र या पूरग्रस्तांकडे बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याबाबत ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चन यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. ते म्हणाले, पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.

नागरिकांनी पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहनही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याबाबत आमचे बोलणे झाले आहे. बॉलिवूड कलाकार नेहमीच सामाजिक काम करत असतात. पण त्याची प्रसिद्धी किंवा जाहिरात करीत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Bollywood Actor Help Advertise Amitabh Bachchan