उल्हासनगरात अनेक परिसर जलमय, दोन भिंती कोसळल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

उल्हासनगर : काल पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगरातील वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून जुना पूल ओव्हरफ्लो झाला आहे.त्यामुळे चांदीबाई कॉलेजच्या कॅम्पस सह अनेक परिसर पाण्यात गेले असून दोन भिंती देखील कोसळल्या आहेत.

सम्राट अशोक नगर,रेणुका सोसायटी,आशिर्वाद कॉलनी,करोतिया नगर,सिब्लॉक,मीनाताई ठाकरे नगर,वाघेला पाडा,बाळकृष्ण नगर,राजीव गांधी नगर,गुलशन नगर,टेलिफोन एक्सचेंज रोड,गोल मैदान हे परिसर पाण्यात गेले आहेत.नागरिकांना मांडी पर्यंतच्या पाण्यातून येण्याजाण्याची वेळ आली आहे. सेंच्युरी रेयॉनची आणि आनंदनगर पंप हाऊसच्या जवळील भिंत कोसळली आहे.या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी आयुक्त गणेश पाटील,मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर,मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी,नंदलाल समतानी,अजित गोवारी,भगवान कुमावत,मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके आदींनी पाणी साचलेल्या परिसरांची पाहणी केली आहे.कोसळलेल्या भिंतींचा मलबा उचलण्यासाठी चार जेसीबी मशीन व आठ डंपर लावण्यात आले आहेत.

Web Title: flood in ulhasnagar 2 walls fallen