Video : कळव्यात पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

- शुक्रवार रात्री पासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शनिवार(ता 3)ला कळवा खारीगाव या ठिकाणी पावसाचे पाणी साठले आहे.
- पावसामुळे कळवा पूर्वचा शिवाजी तलाव पूर्ण भरल्याने या तलावाचे बाहेर आलेले आहे.
- नाल्यातील पाणी व मुसळधार पावसाचे पाणी येथील न्यू शिवाजी नगर येथील अनेक चाळीत शिरले. 
- अनेक घरांतील सामान व जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे.

कळवा : शुक्रवार रात्री पासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शनिवार(ता 3)ला कळवा खारीगाव या ठिकाणी पावसाचे पाणी साठले आहे. या पावसामुळे कळवा पूर्वचा शिवाजी तलाव पूर्ण भरल्याने या तलावाचे बाहेर आलेले आहे. नाल्यातील पाणी व मुसळधार पावसाचे पाणी येथील न्यू शिवाजी नगर येथील अनेक चाळीत शिरल्याने अनेक घरांतील सामान व जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे.

सायबा नगर येथील काही झोपड्यामध्ये सकाळी व  मुंबई-पुणे रस्त्यावर असलेल्या दत्तवाडी परिसरातील चिराग सोसायटीखाली पाणी साठले.  दुपारी दीडच्या भरती नंतर खाडीला प्रचंड भरतीमुळे महात्मा फुले नगरमधील खाडीचे पाणी भरल्याने अनेक झोपड्यामध्ये हे पाणी भरले. 

विटावा सबवेखाली भरतीचे पाणी साठल्याने एकेरी वाहतूक
सकाळपासून कळवा बेलापूर रस्त्यावर वाहतूक सुरू होती. दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास खाडीला भरतीचे आलेले पाणी विटावा 'सबवे' खाली  घुसले. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गात गाड्यांच्यावरपर्यंत पाणी आल्याने गाड्या थांबवुन वाहतूक एकेरी मार्गाने सोडण्यात आली. त्यामुळे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली.
  
कळवा स्थानकात रूळ पाण्याखाली
मुसळधार पाऊस व कळवा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे हे पाणी कळवा रेल्वे स्थानकात आल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते आधीच रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी झाली होती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood waters disrupt lives people in kalwa