वैतरणा नदीच्या पुराचे पाणी घुसले घरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

वाडा : वाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना पुर आला आहे. वैतरणा नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी शिरीषपाडा येथील शेतकऱ्यांच्या घरात घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

शिरीषपाडा येथील सदानंद गोतारणे यांच्या घरात पहाटेच्या सुमारास पाणी घुसल्याने संसारपोयगी वस्तू संपूर्ण भिजल्या आहेत. तसेच फ्रीज पलंग घरात ठेवलेले खत असे संपूर्ण भिजून गेले आहे. येथील नजीब मुल्ला, चितांमण दळवी व सुरेश दळवी यांच्याही घरात पाणी गुडघाभर   घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासन वगळता दुसर्‍या कोणत्याही विभागाने याची साधी दखलही घेतली नसल्याचा आरोप सदानंद गोतारणे यांनी केला आहे.  

Web Title: flooded water enters in home in wada palghar