फुलांचे भाव निम्म्याने घसरले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवानंतर फुलांचे भाव गडगडतात. त्यानुसार यंदाही गणेशोत्सवाच्या तुलनेत भाव कोसळले आहेत. गणेशोत्सवात शेवंतीच्या फुलांचा भाव 400 रुपये प्रति किलो होता. तो आता 200 रुपये प्रति किलो आहे. गुलछडी 600 ते 800 रुपये प्रति किलो होती. ती आता 200 रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे. 

रोहा : गणेशोत्सवात मागणी वाढल्याने फुलांचा भाव चांगलाच वाढला होता. आता पितृपक्ष सुरू झाल्याने त्यांचे भाव निम्म्याहून कमी झाले आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अधिक आहेत. 

गणेशोत्सवानंतर फुलांचे भाव गडगडतात. त्यानुसार यंदाही गणेशोत्सवाच्या तुलनेत भाव कोसळले आहेत. गणेशोत्सवात शेवंतीच्या फुलांचा भाव 400 रुपये प्रति किलो होता. तो आता 200 रुपये प्रति किलो आहे. गुलछडी 600 ते 800 रुपये प्रति किलो होती. ती आता 200 रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे. 

गोंडा आणि कापडीची आवक घटली असल्याने यांचे भाव फारसे उतरले नाहीत. कापडी गणेशोत्सव काळात व आताही 120 ते 160 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. सजावटीच्या फुलांचे भावही निम्मे झाले आहेत. गुलाब मागील आठवड्यात 200 ते 240 रुपये डझन भावाने विकण्यात येत होते. ते आज 100 ते 120 रुपये प्रति डझन भावाने विकण्यात येत अहेत. इतर फुलांचे भावही कमी झाले आहेत. मात्र ते मागच्या वर्षीच्या तुलनेत चढे असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या वर्षी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे फूलशेती नष्ट झाली आहे. त्यामुळे आवक घटली आहे. 

गणेशोत्सव काळात मागणी वाढल्याने फुले महाग होतात. पितृपक्षात मागणी घटल्याने ती स्वस्त होतात. या वर्षी फुलांची आवक कमी असल्याने दरवर्षीच्या तुलनेत फुले महाग आहेत. 
- रवी सोनोने, फूलविक्रेते, रोहा 

गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या पितृपक्षात फुलांचे भाव कमी होतात. यंदा राज्यात आलेल्या पूरस्थितीमुळे फुलांची आवक घटली आहे. भाव कमी झाले असले तरी नेहमीप्रमाणे उतरले नाहीत. 
- मधुकर मालुसरे, जयेश फ्लॉवर मार्ट, कोलाड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower prices fell by half