चित्रपटांच्या निर्यातीवर भर आवश्‍यक - अमिताभ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - भारतीय चित्रपट चांगल्या दर्जाचे असले तरी त्यांच्या परदेशांशी व्यापार करण्याबाबत आपण कमी पडतो, अशी खंत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली. सर्वात जास्त चित्रपट भारतात तयार होतात. मात्र निर्यात वाढवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 

मुंबई विद्यापीठाची गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन डेव्हलपमेंट आणि द रमेश सिप्पी ऍकॅडमी ऑफ सिनेमा ऍण्ड एंटरटेन्मेंट यांच्या वतीने मुंबई विद्यापीठात चित्रपटनिर्मितीचा कोर्स सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्‌घाटन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

विद्यापीठाच्या कालिना संकुलात गुरुवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी बच्चन यांनी आपले अनुभवही सांगितले. आमच्या काळात चित्रपट शिकवण्याचे तंत्र नव्हते. महाविद्यालयांत हा विषयच नव्हता. त्यामुळे चित्रपटात काम सुरू केल्यानंतरच यातील बारकावे शिकता आले. आजच्या पिढीला अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने या क्षेत्रातील प्रशिक्षण घेता येत आहे याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले. 

Web Title: Focus on exports of essential films