न्यायालयीन कामकाजाच्या वेळा पाळा

File Photo
File Photo

मुंबई : न्यायालयीन कामकाज नियमित वेळेतच सुरू करा आणि कामकाजाच्या वेळा पाळा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी सत्र आणि कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांना दिले आहेत.

मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग यांनी काही न्यायालयांमधील कामकाजाची नुकतीच पाहणी केली. त्यात त्यांना कामाच्या वेळा आणि पद्धतीत काही त्रुटी आढळल्या. यासंदर्भात सुधारणा करण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्तींनी दिले आहेत. न्यायालयीन कामकाज सकाळी 11 वाजता सुरू करावे; निर्धारित वेळ पूर्ण होईपर्यंत काम करावे. खटल्यांचा निकाल दिल्यानंतर निकालपत्र संकेतस्थळावर तातडीने अपलोड करावे, असे निर्देश मुख्य न्या. नंद्राजोग यांनी दिले आहेत. 

एखाद्या खटल्याचे कामकाज जाहीर केलेल्या दिवशी होणार नसल्यास पक्षकारांना जवळची तारीख द्यावी; त्यांना ताटकळत ठेऊ नये. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असावी, असेही न्या. नंद्राजोग यांनी म्हटले आहे. मुख्यालय सोडण्यापूर्वी न्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या निर्देशांच्या पालनाबाबत प्रधान न्यायाधीशांनी पाहणी करावी, असेही निर्देशांत म्हटले आहे. याबाबतचे परिपत्रक उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी संबंधित न्यायालयांना पाठवले आहे. न्यायालयीन कामकाज सुरळीत आणि नियोजनबद्ध होण्यासाठी हे निर्देश उपयुक्त ठरतील, असे सांगण्यात आले.

Follow court hours

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com