esakal | अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये! भारतीय बौद्ध महासभेचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये! भारतीय बौद्ध महासभेचे आवाहन

राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी देशभरातील अनुयायांना केले आहे. महासभेने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचे अनुयायांकडून स्वागत होत आहे.

अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये! भारतीय बौद्ध महासभेचे आवाहन

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी देशभरातून लाखो भीम अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल होत असतात; परंतु यंदा कोरोना संकटामुळे अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी देशभरातील अनुयायांना केले आहे. महासभेने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचे अनुयायांकडून स्वागत होत आहे. 

हेही वाचा - वृद्धाच्या पायाला चार किलोची गाठ! शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या दुखण्यातून सुटका

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यविधी मुंबईत दादर चौपाटी परिसरात झाले. ती जागा चैत्यभूमी स्मारक म्हणून सर्वांसाठी वंदनीय आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे दरवर्षी अभिवादन करण्यासाठी 1 ते 6 डिसेंबर या काळात देशभरातील कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर येतात. त्या पार्श्‍वभूमीवर चैत्यभूमी व परिसरात वेगवेगळ्या सुविधांची कामे महापालिकेकडून हाती घेतली जातात; परंतु यंदा कोरोना संकटामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी महापालिका उपलब्ध करून देणार नाही. यंदा महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच सरकारी मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या साह्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून स्थानिक स्तरावरून अभिवादन करता करता येणार आहे. 

हेही वाचा - विनोदी कलाकार भारतीसह पतीला न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार 

कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. तसेच दिवाळीनंतर देशातील विविध शहरांत कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन देशभरातील अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये. आपल्या स्थानिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व घरातील फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करावे. स्थानिक कार्यक्रमावेळी प्रत्येकाने सरकारच्या आदेशानुसार मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. 
- भीमराव आंबेडकर,
राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा. 

चैत्यभूमीची ट्रस्टी या नात्याने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे निवडक वरिष्ठ पदाधिकारी व समता सैनिक दलाचे 100 निवडक सैनिक यांची पोलिस, प्रशासन यांच्यासोबत व्यवस्थेसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. 
- एस. के. भंडारे,
राष्ट्रीय महासचिव, भारतीय बौद्ध महासभा. 

Followers should not come to Chaityabhoomi Appeal of the Indian Buddhist sabha There will be a live broadcast

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )