esakal | आक्षेपार्ह जाहिराती महागात पडणार; FDA कडून कारवाईचा बडगा | Offensive Advertisements
sakal

बोलून बातमी शोधा

FDA

आक्षेपार्ह जाहिराती महागात पडणार; FDA कडून कारवाईचा बडगा

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भ्रामक जाहिरातींचा (Advertisements) आधार घेणाऱ्यांवर आता कारवाईची (FDA Action) कुर्हाड कोसळणार आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे (food and drug administration) अशा आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात कारवाईचा बागडा उगारण्यात आला आहे.

हेही वाचा: KDMC : ‘टोल फ्री’वर खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस

औषधे व जादुटोनादी उपाय सुचवणाऱ्या जाहिराती करून 1954 च्या तरतुदींचे उल्लंघन करणा-यांवर लक्ष ठेवणेकरीता प्रशासनाच्या अधिका-यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाव्दारे 100 पेक्षा जास्त अश्या जाहिराती शोधल्या आहेत ज्यात सदर कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याकरीता संबंधीतांना नोटीस देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. वरील जाहिरातींव्यतिरीक्त भ्रामक किंवा आक्षेपर्ह जाहिराती प्रकाशित करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरिक्षकांकडून कायद्याचे उल्लंघन करणा-या जाहिरातींची नियमित पणे यादी अद्यावत करून कारवाई घेण्याचे काम सुरु आहे.

सदर कायद्याचे उल्लंघन करणा-या सर्व प्रकारच्या जाहिराती वर्तमानपत्रे, होर्डिंगज्, इंटरनेट वेबसाईट, पत्रके, दूरचित्रवाहीनी व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यम इत्यांदींमधून त्वरीत काढून टाकाव्यात. कायद्यामध्ये कायद्याचे उल्लंघन करणा-यास कलम 07 अन्वये कैदेची तरतूद आहे असा इशारा ही देण्यात आला आहे. कोणत्याही भ्रामक जाहिरातीस बळी पडू नये आणि नोंदणीकृत रजिस्टर्ड प्रॅक्टीशनर यांच्या सल्यानुसारच औषधे खरेदी करावीत.कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसल्यास लोकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 6831 किंवा Email ID : acgbmumzone7@gmail.com वर कळवावे असे अवाहन आयुक्त परिमल सिंग यांनी केले आहे.

कोणत्या जाहिरातींवर बंदी ?

गर्भपात करणे, स्त्रियांमधील गर्भधारणा रोखणे, पुरुषांची लैंगिक सुखाची क्षमता टिकवणे किंवा वाढवणे, मासिक पाळी दरम्यान उद्भवणारे विकार बरे करण्याचा दावा. तसेच कर्करोग, मधुमेह, मेंदूचे विकार, स्त्रि-रोग, काचबिंदू, पक्षाघात, कुष्ठरोग, लठ्ठपणा, लैगिक नपुसंगत्व, व्यक्तीची उंची वाढवणे इत्यादी उपचार व निदानाची जाहिरात.

loading image
go to top