मुंबईत 'सीएसटी'जवळ पादचारी पूल कोसळला; 6 जणांचा मृत्यू, 30 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हा पूल कोसळल्यानंतर वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यातील वाहतूक इतरत्र हालविण्यात आली आहे. बचावकार्यासाठी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. 

तपेंद्र सिंह, अपुर्वा प्रभू, साकिरा कुलकर्णी असे या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या नागरिकांची नावे आहेत. या घटनेतील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना पाच लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहिर करण्यात आली आहे.

या घटनेनंतर सर्वच स्तरातून प्रशासनावर टिकेची झोड उठवली जात आहे.  केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी हा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. त्याचा रेल्वे मंत्रालयाशी संबंध नाही. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून सर्वोतपरी मदत करण्यात येईल.

Web Title: foot over bridge collapsed near CST in Mumbai