पदपथांच्या दुरुस्तीसाठी जुने पेव्हरब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - नेरूळमधील डीमार्ट ते एल ॲण्ड टीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथ दुरुस्तीसह ग्रिल बसवण्याचे काम सुरू आहे; मात्र कंत्राटदार येथे जुनेच पेव्हरब्लॉक काढून त्यांना मुलामा देऊन पुन्हा बसवत आहेत, असा आरोप नगरसेवक अशोक गावडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात महापौर व आयुक्तांना पत्र पाठवले आहे. नेरूळमधील निळकंठ हौसिंग सोसायटी, सदगुरु प्लाझा येथील पदपथांची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे पालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

नवी मुंबई - नेरूळमधील डीमार्ट ते एल ॲण्ड टीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथ दुरुस्तीसह ग्रिल बसवण्याचे काम सुरू आहे; मात्र कंत्राटदार येथे जुनेच पेव्हरब्लॉक काढून त्यांना मुलामा देऊन पुन्हा बसवत आहेत, असा आरोप नगरसेवक अशोक गावडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात महापौर व आयुक्तांना पत्र पाठवले आहे. नेरूळमधील निळकंठ हौसिंग सोसायटी, सदगुरु प्लाझा येथील पदपथांची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे पालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. रस्त्याच्या पदपथासह दोन्ही बाजूने ग्रिल बसवयाचे काम करण्यात येणार आहे; मात्र पदपथावरील जुने पेव्हरब्लॉक काढून तेच पुन्हा बसवले जात आहेत, असे गावडे यांनी म्हटले आहे.

Web Title: Footpath repairs