दीड कोटीच्या हर्बल ड्रग्ससह परदेशी नागरिकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - हर्बल ड्रग्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिराच्या पानांसह (खत) इथोपियन नागरिकाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्याच्याकडील तीन बॅगांमधून 60 किलो मिरा पाने जप्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत दीड कोटीपेक्षा अधिक आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपीने केनियातील स्थानिक प्राधिकरणाची प्रमाणपत्रे सादर करून ही हर्बल ड्रग्स बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 

मोहम्मद हमजा अबदी (23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 4 मे रोजी तो इथोपियातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर उतरला. त्यावेळी सीमाशुल्क विभागाला त्याच्यावर संशय आल्यामुळे त्याच्याकडील तीन बॅगांची चौकशी केली असता त्यात संशयिताकडे वनस्पतीची पाने सापडली. त्याबाबत विचारणा केली असता हमजाने केनिया देशाच्या कृषी विभागाचे सायटोसॅनिटरी प्रमाणपत्र व वनस्पतीच्या उत्पादनाबाबतचे प्रमाणपत्र सादर केले. वनस्पतीच्या निर्यातीसाठी या प्रमाणपत्रांची आवश्‍यकता असते. केनिया, इथोपिया, इस्त्राईल या देशांमध्ये या पानांवर प्रतिबंध नाही. मात्र, भारतासह जगातील इतर देशांमध्ये ही पाने प्रतिबंधित असल्यामुळे अखेर बुधवारी (ता.9) मोहम्मदला हवाली गुप्तचर विभागाच्या (एआययू) स्वाधीन करण्यात आले. त्यांनी आरोपीला याप्रकरणी अटक केली. 

मुंबईत शिक्षण घेत असलेल्या इथोपियन विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून त्याने ही हर्बल ड्रग्स आणल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्यासाठी मोहम्मदला 1 हजार अमेरिकन डॉलर (67 हजार रुपये) मिळणार होते. त्यापैकी 450 अमेरिकन डॉलर (सुमारे 30 हजार रुपये) मिळाले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. 

हर्बल ड्रग्स काय आहे? 
केनिया, इथोपिया व सोमालिया यांसारख्या देशांमध्ये मिराच्या पानांचा उत्तेजक म्हणून वापर केला जातो. भारतात ज्याप्रमाणे तंबाखूचे सेवन केले जाते. त्याप्रमाणे तेथे मिराच्या पानांचे सेवन केले जाते. ही पाने एम्फेटामाईन या ड्रग्सच्या सेवनाप्रमाणे नशा देतात. त्यामुळे अमेरिका, चीन, ब्रिटन, कॅनडा आदी देशांनी या पानांवर बंदी घातली आहे. सोमालियन चाचे व दहशतवादी अविकसित भागांमध्ये मिराच्या पानांची शेती करून ते आंतरराष्ट्रीय बाजारात विकतात. त्यातून येणारा पैसा चाचे दहशतवादी कारवायांसाठी वापरतात. 

Web Title: foreign citizen arrested