Sun, May 28, 2023

Mumbai Crime News : मुंबई विमानतळावर 8 कोटींचे परदेशी चलन जप्त...
Published on : 22 February 2023, 3:14 pm
मुंबई : 20 फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळ आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी 8.36 कोटी भारतीय रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाकडून अमेरिकन डॉलर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान जप्त केले.
आरोपीने परकीय चलन एका हँडबॅगमध्ये चलाखीने बारकाईने लपवून ठेवले होते जेणेकरून तपासणीत उघड होऊ नये. परंतु सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान जप्त केले. आरोपी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले असून तपास अधिकारी प्रकरणाची चौकशी करत आहेत.