कोकेन तस्करीच्या जाळ्यात परदेशी तरुणी

कोकेन तस्करीच्या जाळ्यात परदेशी तरुणी

मुंबई - कोकेनची तस्करी करणाऱ्या २० वर्षीय ब्राझीलच्या तरुणीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळावरून अटक करण्यात केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाला (एनसीबी) यश आले आहे. तिच्याकडून सव्वा किलो कोकेन हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे सात कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 

रिबेका अलेक्‍झान्ड्रा मेन्डेस असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून ती ब्राझीलची रहिवासी आहे. आपल्याला इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा तिच्याकडून करण्यात येत असल्यामुळे तिची चौकशी करताना एनसीबीला अडचणी येत आहेत. स्थानिक भाषेच्या जाणकारांच्या मदतीने तिची चौकशी करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

एक तरुणी अमली पदार्थांसह मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचे अधिकारी तैनात होते. रिबेका रविवारी मुंबई विमानतळावर आली असता तिच्याकडील बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिच्याकडे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. तिच्याकडून एक किलो १८० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्या मागे आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. मुंबईत ती कोणाला कोकेनचा साठा देण्यासाठी आली होती त्याची चौकशी एनसीबी करत आहे.

वीस वर्षांच्या शिक्षेची तरतूद 
रिबेका मेन्डेसकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सात कोटी रुपये आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. एवढ्या साठ्यासह अटक झालेल्या व्यक्तीला २० वर्षांपर्यंत शिक्षा व दोन लाखांचा दंड एवढी शिक्षा होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com