विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या परदेशी महिलेला अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

देशी चलनाची तस्करी करणाऱ्या महिलेस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ने अटक केली आहे.

मुंबई : विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या महिलेस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ने अटक केली आहे. मूळची केनिया येथील रहिवाशी असणा-या या महिलेचे नाव उन्शूर फसीहीया हुसैन आहे. तिच्याकडे 9 लाख 12 हजार रुपयांचे अमेरिकन डॉलर सापडले असुन, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्याने दिली आहे. 

उन्शूर ही केनियारुन टुरीस्ट व्हिजावर मुंबईत आली होती. छत्रपती शिवाजी आतंरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर ती येथून ईथिओपीन एअरवेजने अदीस अबाबा येथे जाणार होती. मात्र सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना तिचा संशय आला. त्यामुळे त्यांनी तिची झडती घेतली असता, तिच्याकडे 9 लाख12 हजार रुपयांचे तब्बल 12 हजार अमेरिकन डॉलर सापडले.

याबाबत तिची विचारणी केली असता, ती व्यवस्थित उत्तरे देऊ शकली नसल्याने. सीआयएसएफने तिला कस्टम विभागाच्या हवाले केले. त्यानंतर कस्टम विभागाने तिला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे कस्टम अधिका-यांनी सांगितले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Foreign woman arrested for smuggling foreign currency