सीबीआयसह फॉरेन्सिक विभागातील अधिकारी सुशांतसिंहच्या घरी दाखल; सखोल तपास सुरू

तुषार सोनवणे | Saturday, 22 August 2020

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यावरून शनिवारी सायंकाळी सीबीआयची टीम सुशांतच्या मुंबईतील राहत्या घरी दाखल झाली आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या प्रकऱणाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वेगळे वळण घेतले आहे, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यावरून शनिवारी सायंकाळी सीबीआयची टीम सुशांतच्या मुंबईतील राहत्या घरी दाखल झाली आहे.

तुम्हाला माहित आहे का? मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? वाचा

अभिनेता सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेचे विषय ठरले आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्येने नसून हत्या असल्याचा संशय अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे या तपासाबाबत मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांमध्ये खटके उडाल्याचे दिसून आले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निपक्ष तपास व्हावा यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. गुरूवारी ( ता,20 ) रोजी सीबीआयचे पथक मुंबई दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अनेक बाजूने चौकशी करण्याचा भाग म्हणून सुशांतच्या मुंबई वांद्रे येथील घराचीही चौकशी करणार असल्याचे बोलले जात होते. आज सायंकाळी सीबीआयची एक टीम सुशांतच्या वांद्रे येथील घरी दाखल आहे. सीबीआयसोबत फॉरेन्सिक विभागातील अधिकाऱ्यांची टीमदेखील या ठिकाणी तपास करत असल्याचे पाहायला मिळाले.

 शुक्रवारी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सुशांतच्या स्वयंपाकीची चौकशी केली होती. सीबीआयच्या चौकशी मुळे याप्रकरणी आणखी नवनवे खुलासे समोर येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.