मुलूंडध्ये मोठ्या मगरीला पकडण्यात वनविभागाला यश!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

मुलुंडच्या स्वप्ननगरी विभागातील बांधकाम प्रकल्पातील तलावात गेले चार महिने लोकांना दिसणारी मगर आज जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी तीन महिने चालविलेल्या मोहिमेला आज यश आले.

मुंबई : मुलुंडच्या स्वप्ननगरी विभागातील बांधकाम प्रकल्पातील तलावात गेले चार महिने लोकांना दिसणारी मगर आज जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी तीन महिने चालविलेल्या मोहिमेला आज यश आले.


स्वप्ननगरी विभागात एका अर्धवट सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या जागी 60 - 70 फूट लांब रुंदीचा तलाव तयार झाला होता. त्यात ही मगर प्रथम नोव्हेंबर महिन्यात दिसली होती. ही मगर येथून एक दोन किलोमीटर लांब असलेल्या तुळशी तलावातून येथे आली असावी असा अंदाज आहे.

Image may contain: 3 people, outdoor

सहा फूट लांबीच्या या नर मगरीला आज सकाळी सहा वाजता पिंजऱ्यात पकडण्यात आले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करून तिला दुपारी साडेतीनच्या सुमारास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Image may contain: 1 person

वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन आणि रॉ या वन्यजीवप्रेमी संघटना तसेच मुंबई वनविभाग यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली होती. डिसेंबरपासून तिच्या हालचालींचे निरीक्षण सुरू करण्यात आले. जानेवारीत पहिल्यांदा तिला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.

Image may contain: one or more people, people sitting and outdoor

मात्र ती पिंजऱ्यात न गेल्याने कार्यकर्त्यांनी वेगळी युक्ती केली. तेथे आठ ते नऊ फूट खोल खड्डा खणून त्याच्या बाहेर दोर लावून तेथे दार करण्यात आले, त्या खड्ड्यात भक्ष टाकण्यात आले.

Image may contain: 7 people, people standing and outdoor

तेथे 360 अंशाच्या कोनातून फिरणारा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला व तो मोबाईलच्या साह्याने फिरवता येईल अशी व्यवस्था करण्यात आली. ही मगर अनेकदा खड्ड्यात आली मात्र काहीवेळा दरवाजा बंद होऊ शकला नाही.

Image may contain: 1 person, outdoor

एकदा त्या मगरीने बांध तोडल्याने त्या खड्ड्यात पाणी आले त्यामुळे मग पुन्हा परत तलावात गेली. हे प्रयत्न फसल्यावर कार्यकर्त्यांनी तज्ञांशी चर्चा करून दहा फूट लांब व तीन फूट रुंद पिंजरा करून तो अर्धवट पाण्यात ठेवला.

Image may contain: outdoor and water

तीन दिवसांपूर्वी हा पिंजरा पाण्यात ठेवला व आज ही मगर यात अडकली असे डब्ल्यूडब्ल्यूएफ चे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी सकाळला सांगितले.

Image may contain: outdoor

साडेसहा फूट लांबीची ही मगर मार्श क्रोकोडाईल जातीची असून अशा मगरी तुळशी तलाव आढळतात. या बांधकाम प्रकल्पाशेजारी नाला असल्याने तेथून ही मगर येथपर्यंत चालत आली असेल किंवा पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे ती येथपर्यंत आल्याची शक्‍यता आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Image may contain: outdoor

या तलावातील मासे, बेडूक तसेच तेथे येणारे पक्षी यांना ही मगर भक्ष्य बनवत होती असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest department succeeds in catching big crocodile!