चाळीतल्या पोपटांवर वन विभागाची नजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - भारतीय प्रजातीचे पोपट पाळल्यास नागरिकांना दंडासह तुरुंगाची हवा खाण्याची वेळ येणार आहे. चाळीतील रहिवाशांना पोपट पाळण्याची हौस असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता चाळीतील रहिवाशांवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

वन विभागाने जुलैपासून मुंबईत भारतीय प्रजातीचे पोपट पाळणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामुळे छापासत्र मंदावले होते. आता कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. वन विभागाने नोव्हेंबरपासून तीन ठिकाणी कारवाई केली. आतापर्यंत १५ हजार रुपयांची दंडवसुली झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वन विभागाच्या आवाहनानंतर आठवडाभरात केवळ १० पोपट नागरिकांनी जमा केले. बोरिवली, मुलुंड, भांडुप आणि कुर्ल्यातील रहिवाशांनी हे पोपट पाळले होते. नागरिकांमध्ये फारसे गांभीर्य दिसत नसल्यामुळे पोपट पाळल्यास यापुढे दोन  हजार ते २५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे असा गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासही भोगावा लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

पोपट स्वत:हून जमा करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही. त्यासाठी वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
- संतोष कंक, वनक्षेत्रपाल, मुंबई विभाग, ठाणे प्रादेशिक वनविभाग

माहिती मिळाल्यास छापासत्र
वन विभागाने आतापर्यंत १७ ठिकाणांहून पोपट ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी बहुतेक पोपट चाळींमधील रहिवाशांनी पाळले होते. त्यामुळे वन विभागाने चाळींमधील रहिवाशांवर लक्ष ठेवले आहे. पोपट पाळणाऱ्यांबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यास १० दिवसांत छापासत्र राबवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Forest Department watch on parrots