देवेंद्र फडणवीस यांचा नवीन पत्ता काय?; कोठे होणार शिफ्ट? 

former cm devendra fadnavis to shift his residence from varsha bungalow
former cm devendra fadnavis to shift his residence from varsha bungalow

मुंबई : मी पुन्हा येईन, मी पुन्हा येऊन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री होते. त्यानंतर अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. पण, अजित पवार यांनीच साथ सोडल्यामुळं त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. परिणामी त्यांना वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडावे लागत आहे. गेले दोन दिवस वर्षा बंगल्यावर फडणवीस कुटुंबाच्या सामानाची बांधाबांध सुरू आहे. पण, देवेंद्र फडणवीस यांचा नवीन पत्ता काय असणार, याची सर्व महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

...तरच फडणवीस यांना सरकारी बंगला!
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात वर्षा बंगला राजकीय घडामोडींचे केंद्र स्थान होता. या बंगल्यावर फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. आता फडणवीस यांना हा बंगला सोडवा लागणार आहे. भाजपने विरोधीपक्ष नेतेपदासाठी फडणवीस यांचेच नाव पुढे केल्यामुळे आतात त्यांना विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला सरकारी निवासस्थान म्हणून मिळणार आहे. नेत्यांना बंगले देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. त्यातही बरीच नियमावली आहे. उद्या विधानसभेत सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. या ठरावाबरोबरच विरोधीपक्ष नेत्याचीही निवड होईल. त्यात जर, फडणवीस हे विरोधीपक्ष नेते झाले नाही तर, माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारी निवासस्थान मिळणार नाही. 

काय असणार पत्ता? 
विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडे होते. तर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते पद धनंजय मुंडे यांच्याकडे होते. या दोन नेत्यांच्या बंगल्यापैकी एकाचा बंगला फडणवीस यांना मिळण्याची शक्यता आहे. विजय वडेट्टीवार यांची उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांना मंत्र्यांचा बंगला मिळेल. तर, धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यामुळं त्यांना विधानपरिषदेचं विरोधीपक्ष नेते पद सोडावं लागणार आहे. त्यांचीही मंत्रिमंडळा वर्णी लागण्याची शक्यता असल्यामुळं त्यांचा बंगलाही रिकामा होणार आहे. या दोन नेत्यांच्या बंगल्यांपैकी एका बंगल्यात फडणवीस यांचे सरकारी निवासस्थान असणार आहे. मंत्रालयासमोरच हे बंगले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तेथे शिफ्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com