'दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही'

'दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही'

मुंबई -  ‘‘काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गंमत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने...स्वकर्तृत्वाने चालवणारे लोक आहोत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक विधानावर टोला लगावला.

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात नाशिकमधील माजी आमदार प्रशांत हिरे व अपूर्व हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

‘‘आम्हाला माहीत होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही. आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्‍यकता नाही. आपला खराखुरा बाप शेतकरी आहे. त्याच्या मदतीने पुढे जावूया,’’ अशा शब्दांतही पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता हल्ला चढवला.

‘‘हिरे कुटुंबीय दुसऱ्या पक्षात गेले तो अपघात होता. त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे. भुजबळांना बळ देण्यासाठी हे दोन तरुण आता उभे ठाकले असून, आता सगळ्या क्षेत्रांत नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी कामाला लागा, आमची साथ कायम राहील,’’ असे आश्‍वासन पवार यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com