
शलाका मुनगंटीवार हिच्या लग्न समारंभादरम्यान संगीत कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह ताल धरला. त्यांचे ही स्टाईल बघून सगळे प्रेक्षक त्यांच्याकडे बघतच राहिले.
मुंबई : राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे एक वेगळेच रूप आज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुनगंटीवार यांच्या मुलीचे म्हणजेच शलाका मुनगंटीवार हिच्या लग्न समारंभादरम्यान संगीत कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह ताल धरला. त्यांचे ही स्टाईल बघून सगळे प्रेक्षक त्यांच्याकडे बघतच राहिले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीचा शलाकाचा विवाह तन्मय बिडवाई यांच्यासोबत 1 डिसेंबरला पार पडला. याच लग्न सोहळ्यादरम्यान मुनगंटीवार पती-पत्नी वेगवेगळ्या गाण्यांच्या फ्युजनवर झळकले. छोड दो आचल जमाना क्या कहेगा, हम तो तेरे आशिक है सदियों पुराने आणि हम साथ साथ है या गाण्यावर त्यांनी ताल धरला आणि सुंदर डान्स केला. विशेष म्हणजे हा डान्स करताना ते अजिबात नवखे वाटत नव्हते.
Video
A Suitable Boy : 24 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत तब्बू करतेय रोमान्स!
यापूर्वी ते मुंबईच्या रिव्हर अँथममध्येही गाणे म्हणताना दिसून आले होते. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही गाणे म्हणले होते. व्हायरल होत असलेल्या या डान्समुळे मुनगंटीवारांमधील वेगळे पैलू समोर आले आहेत.