मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणेचे माजी अध्यक्ष पांडूरंग दातार यांचे निधन

datar
datar

ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे संस्थेचे माजी अध्यक्ष पां. के. उर्फ पांडुरंग केशव दातार (वय 84) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने रहात्या घरी निधन झाले. शनिवारी सांयकाळी त्यांच्यावर ठाण्यात अंतिम संस्कार करण्यात आले.

पांडूरंग दातार यांचा जन्म पनवेल येथील असून शालेय शिक्षणही पनवेलमध्येच झाले. 1950 साली दातार ठाणे येथे वास्तव्यास आले. एस. टी. महामंडळात नोकरी करत दातार यांनी आपली साहित्यविषयक आवड जोपासली. या आवडीमुळेच ठाण्यातील विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मराठी ग्रंथ संग्रहालयाशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. दातार यांनी ग्रंथ संग्रहालयासाठी भरीव कामगिरी केली असून दातार आणि मराठी ग्रंथ संग्रहालय असे समीजकरणच तयार झाले आहे. यामुळेच आजही लोक त्यांच्या नावाने ग्रंथ संग्रहालयाला ओळखतात.

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे त्यांनी तीन वेळा अध्यक्षपद भूषविले.याशिवाय संग्रहालयाच्या कार्यवाह पदाची धुराही त्यांनी सांभाळली. 2010 मध्ये ठाण्यात झालेल्या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन आणि नियोजन त्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण रित्या केले. या साहित्य संमेलनासाठी भरीव निधीचे संकलन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या संमेलनातून शिल्लक राहिलेला निधी मराठी ग्रंथसंग्रहालयाला अनेक नावीन्यपुर्ण योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरला. केवळ मराठी ग्रंथसंग्रहालयच नाही तर ठाणे नगर वाचन मंदिर या ठाण्यातील दुसर्या जुन्या असलेल्या ग्रंथालयातही त्यांनी पदे भूषविली. ठाणे जनता सहकारी बँकेचे ते 5 वर्ष संचालकही होते. ब्राम्हण सभा, समर्थ सहकारी भांडार, सहकार भारती, संस्कार भारती या संस्थांच्या कार्यातही ते कायम सक्रीय होते. ठाण्यात चित्तपावन ब्राम्हण संघाच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यातही त्यांचे योगदान होते.

मनमिळाऊ आणि मितभाषी स्वभावामुळे ठाण्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक वर्तुळात त्यांच्याबद्दल कायम आदराची भावना होती. 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथसंपदेचे नुकसान होवू नये, यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मराठी साहित्य संमेलनांना ते नियमित हजेरी लावत. त्यांच्या संग्रही अनेक मराठी पुस्तके होती. या पुस्तकांचे वाटप त्यांनी ठाणे जिल्ह्यातील वाचनालयांना केले. त्यांच्या पश्चात रवींद्र आणि नरेंद्र ही दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com