चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई परिसरात वायू गॅस गळती सदृश्य वासाच्या तक्रारी...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

गोवंडी, पवई, भांडुप या भागातून आज रात्री उशिरा गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.

मुंबई - गोवंडी, पवई, भांडुप या भागातून आज रात्री उशिरा गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. कसली तरी दुर्गंधी येत असल्याच्या नागरिकांच्या गोवंडी भागातून 21 तक्रारी आल्या. पवई, भांडुप या भागातूनही नागरिकांच्या तक्रारी पालिकेकडे आल्या. त्यामुळे अग्निशमन दल, बीपीसीएल यांनी  या घटनेची नागरिकांच्या तक्रारीवरून तत्काळ चाचपणी सुरू केली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती या विभागाने दिली.

याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विटरवरून माहिती दिली आहे

 

दरम्यान मिळालेल्या माहितीवरून १३ फायर इंजिनसह अग्निशमन दलाची  पथकं पूर्व उपनगरातील विविध ठिकाणी तपासणी करत आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियम, महनगर गॅस तसेच राष्ट्रीय केमिकल फल्टिलायझर कंपनीची पथकही शोध घेत आहेत. तसेच गॅसचा वास येत असल्यास नागरीकांनी घाबरुन न जाता ओला टॉवेल अथवा रुमाल नाकावर बांधावा असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foul odour across some parts of Mumbai Fire Brigade has been activated