उल्हासनगरात डेंग्यूचे 26 संशयित रुग्ण

दिनेश गोगी
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

उल्हासनगर : साथीच्या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवणारे उल्हासनगर सध्या डेंग्यूच्या तापाने फणफणले आहे. शहरात डेंग्यूच्या 26 रुग्णांची संख्या असून काल रात्री एका मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्किटेक्ट अतुल देशमुख हे कॅम्प नंबर 4 मध्ये शिवसेना नगरसेवक रमेश चव्हाण राहत असलेल्या संभाजी चौकातील गुरुदत्त सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा अनिरुद्ध हा मुलगा इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत आहे. त्याला तीन चार दिवसांपासून ताप येत असल्याने नेताजी चौकातील संजीवनी या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अनिरुद्धला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर अतुल देशमुख त्यांची पत्नी भयभीत झालेले आहेत. नगरसेवक रमेश चव्हाण यांनी ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजा रिजवानी यांना दिल्यावर त्यांनी संजीवनी रुग्णालयात दाखल असलेल्या अनिरुद्धची भेट घेतली आहे. उद्या शुक्रवारी गुरुदत्त सोसायटी मधील पाण्याचे नमुने घेऊन डेंग्यूवर मात करणारी किंबहूना नियंत्रणात आणणारी फवारणी मारण्यात येणार असल्याचे रिजवानी यांनी सांगितले.

उल्हासनगरात डेंग्यूचे 26 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह असून सर्व रुग्णांची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती देखील डॉ.राजा रिजवानी यांनी दिली.

Web Title: found 26 suspects of dengue in ulhasnagar