पालघर - वाड्यात पुन्हा सापडला जिवंत बॉम्ब

दिलीप पाटील
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

वाडा : दोनच दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील देवळी गावातील शेतात बॉम्ब सापडल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील सासणे या गावात दुसरा जिवंत बॉम्ब सापडल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे. 

देवळी गावापासून 3 किमी असणाऱ्या सासणे या गावापासून जवळ एका टेकडीवर हा जिवंत बॉम्ब असल्याची माहिती एका ग्रामस्थाने दिल्यानंतर पोलीसांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला असून या प्रकरणी अधिक तपास वाडा तहसील व पोलीस प्रशासन करीत आहे.

तालुक्यातील देवळी  येथे शेतात काम करणाऱ्या मजुरांना दोन दिवसांपूर्वी हा बॉम्ब आढळून आला होता. याबाबत बॉम्ब पथकाने हा जिवंत बॉम्ब असल्याची माहिती दिली. शुक्रवारी (ता. 26) तालुक्यातील देवळी या गावापासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या सासणे गावाजवळील टेकडीवरही बॉम्ब असल्याची माहिती दिल्यानंतर तालुका प्रशासनाने हा बॉम्ब ताब्यात घेतला आहे. देवळीमध्ये सापडलेला व आता सासणे येथे आढळून आलेला बाॅम्ब हे एकसारखे दिसून येत आहेत. 

दरम्यान या परिसरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांच्या छावण्या असल्याचे जेष्ठ ग्रामस्थांचे म्हणणे असून हे बॉम्ब त्याच काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील आबिटघर गावातील स्टील कंपनीतील भंगारात अशाच प्रकारचे बॉम्ब आढळून आले होते. सदर कंपनीतील भंगार अरब देशातून आयात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सध्या शेतात व माळरानावर सापडणाऱ्या या बॉम्बचे गूढ वाढले असून या बाबत अधिक चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, सुरक्षिततेची काळजी म्हणून मानिवली परिसरातील गावांमध्ये तलाठ्यांमार्फत दवंडी देऊन बाँब सदृश वस्तू आढळल्यास तिला हात लावू नका किंवा जवळपास थांबू नका अशा सूचना प्रशासनाकडून दिल्याची माहिती नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांनी दिली.

Web Title: found live bomb in wada palghar