बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ लांबणीवर; आंबेडकरी नेत्यांना निमंत्रणच नाही

तेजस वाघमारे | Friday, 18 September 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील महत्वाचा टप्पा असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ शुक्रवारी (ता. 18) आयोजित करण्यात आला होता

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील महत्वाचा टप्पा असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ शुक्रवारी (ता. 18) आयोजित करण्यात आला होता. परंतु या कार्यक्रमाला आंबेडकरी नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने या कार्यक्रमावर आक्षेप घेण्यात आला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या कार्यक्रमाची नवी तारीख एमएमआरडीए जाहीर करणार आहे.

सुशांतसिंग मृत्यू प्रकरण! चित्रपटसृष्टीतील एक पार्टी एनसीबीच्या रडावर; छाप्यात 5 जणाना अटक

दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन 2016 मध्ये झाले होते. यानंतर पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. या खर्चाला एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शुक्रवारी (ता.18) बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्य मंत्रीमंडळातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र आंबेडकरी नेत्यांना निमंत्रित न केल्याने नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. नेत्यांनी नाराजी व्यक्त करताच याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला. यामुळे मोठा वाद टाळला आहे.

पीक कर्ज माफी योजना सरसकट का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर एमएमआरडीएने पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले होते, मात्र अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे मी लक्षात आणून दिले आहे. त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश मी दिले आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )