रेल्वेत मद्याचा अवैध व्यवसाय करणाऱ्या चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई- रेल्वेमध्ये मद्याचा अवैध व्यवसाय करणाऱ्या कोच अटेंडंट्सच्या चौकडीला कल्याण आरपीएफ पोलीसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून मद्याच्या 45 बाटल्या हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे एक्सप्रेसमधील कोच अटेंडंट्सकडून या मद्याची बाहेर विक्री केली जात असल्याचेही प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

कारावली दुरंतो एक्स्प्रेसमधून मद्यांचा अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती कल्याण आरपीएफ क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक संदीप ओंबासे यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. 15) ओंबासे यांनी आपल्या पथकासह या गाडीच्या A-1 कोचमधील अटेंडंट्स विश्वेश्वर राम, B-1मधील शूलमन अग्रवाल, B-3मधील ज्ञानेश्वर अंबानी चौधरी, B-4 मधील मोहन तुलसा शाहू यांची चौकशी केली. तसेच त्यांच्या वस्तूंची झाडाझडती घेतली असता विविध प्रकारच्या मद्याच्या 45 बाटल्या आढळून आल्या. त्याबाबत या कोच अटेंडंट्सकडे विचारणा केली असता गोव्यातून हे करमुक्त (टॅक्सफ्री) मद्य विकत घेऊन मुंबई परिसरात विक्री केली जात असल्याची या चौघांनी कबुली दिली, असे ओंबासे यांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी या चौघांनाही उत्पादन शुल्क खात्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

Web Title: Four arrested for illegal liquor railway station