चार कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चार कोटी 70 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपुंज गुप्ता याला अटक केली. त्याला न्यायालयाने 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

गुप्ता हा मूळ गाझियाबादचा रहिवासी आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात नोकरीला होता. त्याने जुलै ते डिसेंबर 2017 या कालावधीत चार कोटी 71 लाखांची फसवणूक केल्याचे कार्यालयातील अंतर्गत तपासणीत उघड झाले. याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

गुप्ताने गाळे, सदनिकांच्या नावाखाली काही जणांची रक्कम एनईएफटी करून घेतल्याचे तपासात उघड झाले. तपासादरम्यान पोलिसांनी सहा जणांचे जबाब नोंदवले. गैरप्रकारानंतर गुप्ता पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला गेले होते; मात्र तेथे तो सापडला नाही. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला काश्‍मीर येथे ताब्यात घेऊन बुधवारी मुंबईत आणले. त्याच्याकडे दोन धनादेश सापडले. पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. 

Web Title: Four crores fraud cheating

टॅग्स