डोंबिवलीत दोन अपघात चार ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

डोंबिवलीत एकाच दिवशी झालेल्या दोन अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये विकासनाका येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा; तर मंजुनाथ विद्यालयाजवळ झालेल्या दुसऱ्या अपघाता एका शिक्षकाचा मृत्यू झाला.

मृतामंध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
कल्याण - डोंबिवलीत एकाच दिवशी झालेल्या दोन अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये विकासनाका येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा; तर मंजुनाथ विद्यालयाजवळ झालेल्या दुसऱ्या अपघाता एका शिक्षकाचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

पहिल्या घटनेत कचोरे येथे राहणारे गणेश चौधरी कुटुंबासह दुचाकीवरून जात असताना कल्याण-डोंबिवली मार्गावर विकास नाक्‍याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव डम्परची धडक बसली. या अपघातात चौधरी यांच्यासह त्यांच्या पत्नी उर्मिला चौधरी (25) आणि मुलगी हंसिका चौधरी (4) यांचा जागीच मृत्यू झाला. चौधरी यांचा दोन वर्षीय मुलगा ओम सुदैवाने या अपघातातून बचावला आहे. या अपघातामुळे कचोरे परिसरावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डम्परचालकाला ताब्यात घेतले आहे.

राजभवन स्फोटकांनी उडविण्याची धमकी

दुसऱ्या घटनेत कल्याण येथील रहिवासी असलेले आणि डोंबिवली येथील डीएनसी शाळेतील शिक्षक प्रभाकर ठोके यांचा दुचाकीला डम्परने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीने शाळेत जात असताना मंजुनाथ विद्यालयाजवळ कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या डम्परने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. शाळेत सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांच्या कामासाठी ठोके निघाले होते. 2007 पासून ते डीएनसी शाळेत गणित विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षक संघटनेमध्ये क्रियाशील असलेले ठोके सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातही अग्रेसर होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिक्षक सेलमध्ये ते पदाधिकारी म्हणून काम पहात होते. ठोके यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four death in two accident in dombivli