भारतात पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत 400 टक्के वाढ, 'या' पर्यायाचा वापर करतेय तरुणाई

भारतात पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत 400 टक्के वाढ, 'या' पर्यायाचा वापर करतेय तरुणाई

गेल्या वर्षी केंद्र सरकारने भारतात बघितल्या जाणाऱ्या तब्बल आठशे सत्तावन्न पॉर्न साईट्स बंद करण्याचा निर्णय घेतला. पण खरंच सरकारला जे अपेक्षित होतं ते त्याच पद्धतीने झालंय का? लोकांनी पॉर्न पाहणं बंद केलं का ? तर त्याच उत्तर आहे नाही. एका अहवालाच्या आधारे पॉर्न साईट्स बंद केल्यानंतर VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायवेट नेटवर्कच्या माध्यमातून पॉर्न मजकूर किंवा व्हिडीओ पाहण्यामध्ये चारशे टक्के वाढ झालीये. 

न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरातील आठशेच्यावर पॉर्न साईट्स बंद केल्या गेल्यात. तसे आदेश न्यायायालाने इंटरनेट सुविधा देणाऱ्या कंपन्यांना दिलेत. मात्र लोकांना हा निर्णय अजिबात पचलेला नाही आणि म्हणूनच इंटरनेट वरील अशाप्रकारचे व्हिडीओ किंवा मजकूर थांबवणं हे सरकारसमोर मोठं आव्हान बनलं. 

  • VPN अॅप च्या माध्यमातून डाऊनलोड करून बंदी घातलेल्या पॉर्न साईट्सवर जाण्याचं प्रमाण तब्बल 405 टक्क्याने वाढलंय 
  • VPN द्वारा अशा पॉर्न साईट्सवर येणाऱ्यांची संख्या 5 कोटी 70 लाखांवर पोहोचलीये 
  • गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड केलेल्या VPN मोबाईल अॅप्सच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे.         
  • वरील आकडेवारी ही ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 दरम्यानची आहे.  

ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान प्रत्येक महिन्यात VPN मोबाईल अॅप वापरणाऱ्यांची संख्या 66 टक्क्यांनी वाढलीये. फ्री टर्बो, सोलो व्हीपीएन आणि हॉटस्पॅाट शिल्ड फ्री असे  VPN अॅप्स तब्बल 1 कोटी 35 दशलक्ष लोकं वापरतायत. 

WebTitle : four hundred percent increase in people who watched pron in India 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com