आमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे, मंगेश सावंत, विशाल खंदारे आणि सूरज ऊर्फ सटकू कारके अशी आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी दोन मोटारी, एक मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त केली आहे. आरोपींना बुधवारी (ता. 17) न्यायालयात हजर केले जाणार आहे. नवरात्रोत्सव मंडळांना भेट देत असताना गेल्या आठवड्यात रात्री आमदार काते यांच्यावर स्वधर्म प्रतिष्ठान मंडळाच्या मंडपात पाच-सहा जणांनी हल्ला केला होता. 

Web Title: Four people arrested for attacking MLA Katte