Mumbai Rains : गोरेगावमध्ये दरड कोसळली,चार जखमी

landslide
landslide

मुंबई : मुसळधार पावसामुळे गोरेगाव पूर्वमधील दिंडोशी परिसरातील राजीव गांधी नगरमध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

ही दरड काही घरांवर कोसळल्याने मातीच्या मलब्याखाली काही लोक दबल्याने दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे.

मोहम्मद हुसेन शेख (15), झुबेदा बानू शेख (14), अब्दुल गफार शेख (42), अहमद हुसेन शेख (14) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरड कोसळल्याने खाली आलेला मातीचा मलबा साफ करण्याचं काम सध्या सुरू आहे.

उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली सतर्कतेचा इशारा
कर्जत येथे 27 जुलै पेक्षा जास्त पाणी उल्हास नदीला आले आहे. वलीवली पुलाजवळून उल्हासनदी दुथडी भरून वहात आहे. बारवी धरणातुन सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार आहे त्यामुळे आपल्याकडे २७ जुलै पेक्षा गंभीर स्थिती आज होऊ शकते तरी सर्वानी कृपया काळजी घ्यावी आमदार किसन कथोरे यांनीही नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com