जुहू समुद्रात चौघे बुडाले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी चौघे बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांचा शोध घेत होते.

अंधेरीत राहणारे वसीम खान, फरदीन सौदागर, मोहीन शकील खान, फैजल शेख आणि नझीर गांची हे १७ ते २१ वयोगटातील पाच मित्र गुरुवारी सायंकाळी जुहू चौपाटीवर गेले होते. भरती असल्यामुळे समुद्रात जाऊ नका, या जीवरक्षकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत ते पोहण्यासाठी गेले. भरतीमुळे वसीम वगळता अन्य चौघे समुद्रात ओढले गेले. वसीमला जीवरक्षकांनी सुखरूप किनाऱ्यावर आणले. 

Web Title: four person drowned in Juhu Sea