उल्हासनगरात चार गावठी पिस्तुल-कठ्ठे जप्त, तीन आरोपी अटकेत

crime_logo
crime_logo

उल्हासनगर - गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका इसमाला एक गावठी पिस्तुल व दोन कठ्यांसह अटक केली आहे. यापूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी दोघांना एका कठ्यासह अटक केली आहे. उल्हासनगरात आठवडाभरात या दोन घटना घडल्याने कल्याण लोकसभा निवडणूक पिस्तुल-गावठी कठ्यांच्या रडारवर असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहाड रेल्वे स्थानकाजवळ घातक शस्रांसोबत एक इसम येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा झेंडे, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक उपनिरीक्षक भरत नवले, सुरेंद्र पवार, रमजू सौदागर, आर.टी.चव्हाण, संजय माळी, प्रितम भोगले, विठ्ठल पदमेरे, बाबूलाल जाधव, योगेश पारधी शहाडच्या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूला व परिसरात सापळा रचला. तेंव्हा एक इसम रिक्षा स्टँड, उड्डाणपुलाच्या भागात बॅग सोबत संशयास्पद रित्या फिरून कुणाला तरी शोधत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 

पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये एक गावठी पिस्तुल, दोन कठ्ठे व तीन जिवंत काडतुसे आढळून आले.

पिस्तुल-गावठी कठ्यांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गोविंदसिंह भदौरिया आहे. तो मुळचा मध्यप्रदेशचा असून सध्या उल्हासनगरातील शांतीनगर भागात राहणारा आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता 3 एप्रिल पर्यंत पोलीस कष्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याने ही घातक शस्रे कुठून आणली? कुणाला विकणार होता? लोकसभा निवडणुकीत घातपात करण्याचे कटकारस्थान रचण्यात येणार आहे काय? याची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

दरम्यान तीनचार दिवसांपूर्वीच विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक नंदलाल खडकीकर हे पथकासोबत व्हिटीसी परिसरात गस्त घालत असताना त्यांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या आशिष पाल,करण गवई या तरुणांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एक गावठी कठ्ठा व जिवंत काडतुसे मिळाली होती.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आठवड्यात ह्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com