चार विद्यार्थ्यांनी उकिरड्यावर फुलवले नंदनवन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - शिव येथील रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेचा उकिरडा झाला होता. तेथील अस्वच्छता दूर करून चार विद्यार्थ्यांनी तेथे उद्यान फुलवले आहे. मेहनतीने आणि कल्पकतेने विद्यार्थ्यांनी या पडीक जागेचा कायापालट केला आहे. त्यांनी तेथे अडगळीत पडलेल्या वस्तूंचा वापर करून ही किमया साधली आहे. रोहन पडवळ, थॉमस फ्रान्सिस, पिनाली जैन, मिताली भांबुरे या चार विद्यार्थ्यांनी ही किमया साधली आहे.

आयईएस कॉलेजच्या ऑफ आर्किटेक्‍टच्या चार विद्यार्थ्यांना अर्बन डिझाईन हा प्रोजेक्‍ट देण्यात आला होता. या प्रोजेक्‍टसाठी विद्यार्थ्यांनी शिव रेल्वे स्थानकाजवळील पडीक जागेची निवड केली. पुलाच्या बाजूला असलेल्या या जागेचा वापर होत नसल्याने त्याचा उकिरडा झाला होता. त्यामुळे येथे कचरा आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या जागेकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्‍टसाठी या जागेची निवड केली आणि जागेच्या कायापालटाला सुरुवात झाली.

या जागेत पडलेल्या वस्तूंचा वापर करून जागेला नवे रूप देण्यात आले. जागेची रंगरंगोटी करून मोकळ्या जागेत हिरवळ फुलविण्यात आली. येथील आकर्षक रंगरंगोटीमुळे येथे पान, तंबाखू खाऊन थुंकणारेही थबकत आहेत. येथे कचरा टाकू नये, स्वच्छ मुंबई हरित मुंबई असे संदेश देण्यात आले आहेत.

सुशोभीकरणासाठी नवी रोपे लावण्यात आली आहेत. बसण्यासाठी आणि पाय मोकळे करण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी घाम गाळून मोठ्या कल्पकतेने या जागेचा कायापालट केला आहे.

Web Title: Four students develop to bad place