बनावट आधार कार्डप्रकरणी चार अटकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई  : बनावट कागदपत्रांच्या साह्याने नेपाळी व्यक्तीला आधार कार्ड बनवून दिल्याप्रकरणी चार जणांना मंगळवारी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. तपेंद्र मोती आऊजी, संजय शंभू कानडे, राहुल नवीनचंद्र पांचाळ, इम्रान अहमद सुल्तान अहमद शेख अशी या चौघांची नावे आहे. चौघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सांताक्रूझ परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.

मुंबई  : बनावट कागदपत्रांच्या साह्याने नेपाळी व्यक्तीला आधार कार्ड बनवून दिल्याप्रकरणी चार जणांना मंगळवारी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. तपेंद्र मोती आऊजी, संजय शंभू कानडे, राहुल नवीनचंद्र पांचाळ, इम्रान अहमद सुल्तान अहमद शेख अशी या चौघांची नावे आहे. चौघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सांताक्रूझ परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. परिमंडळ- ९ चे उपायुक्त परमजितसिंग दहिया, सहायक आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. 

Web Title: Four suspects in fake identity card case