ठाण्यात चार वाहने खड्ड्यात कोसळली ; जीवितहानी नाही 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

वर्तकनगर परिसरातील म्हाडा वसाहतीत जमीन खचल्याने इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार वाहने कोसळली. शनिवारी सकाळी ही घटना घडली.

ठाणे : वर्तकनगर परिसरातील म्हाडा वसाहतीत जमीन खचल्याने इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार वाहने कोसळली. शनिवारी सकाळी ही घटना घडली. यात तीन रिक्षा आणि एका स्कूल व्हॅनचा समावेश आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही; मात्र वाहनांचे नुकसान झाले. 

म्हाडा वसाहतीतील इमारत क्र. 62 चे पुनर्विकास सुरू असल्याने विकसकाने या ठिकाणी मोठा खड्डा खोदला आहे. लगतच्या जागेवर स्थानिक रहिवासी आपली वाहने उभी करतात. विकसकाने या खड्ड्याभोवती संरक्षक पत्रे उभारले आहेत; मात्र पावसामुळे जमीन खचून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या तीन रिक्षा आणि एक स्कूल व्हॅन 25 फूट खड्ड्यात कोसळली. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहने क्रेनच्या साह्याने वर काढण्याचे काम सुरू होते. 

Web Title: Four vehicles in Thane collapsed in pits Not to be alive

टॅग्स