मुंबईत आता चार चाकी रिक्षा

मुंबईत दाखल झालेली ‘क्‍यूट’ क्वाड्रीसायकल रिक्षा.
मुंबईत दाखल झालेली ‘क्‍यूट’ क्वाड्रीसायकल रिक्षा.

मुंबई - प्रवासी वाहतुकीच्या नियमांच्या कात्रीत अडकलेली बजाज ऑटोची चारचाकी क्वाड्रीसायकल रिक्षा अखेर मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. चार सीटर रिक्षा विक्री सुरू झाली आहे. तर पहिली गाडी मुंबईच्या रस्त्यावर धावली असून, पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणारी, अवघ्या तीन लाखांपेक्षा कमी किमतीत घेता येणार आहे. ‘क्‍यूट’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

बजाज ऑटोची गेल्या चार वर्षांपासून या चारचाकी रिक्षाची निर्मिती सुरू होती. मात्र नियमांच्या कात्रीत अडकल्याने रिक्षाची विक्री थांबली होती. त्यानंतर गेल्या वर्षात रिक्षाची विक्री सुरू झाली. त्यांतर काही राज्यांमध्ये चारचाकी रिक्षा रस्त्यावर धावायला लागल्यानंतर आता राज्यात सुद्धा चारचाकी क्वाड्रीसायकल रिक्षा दाखल झाली आहे.

टाटाच्या नॅनो कारनंतर, क्वाड्रीसायकल ही सर्वांत लहान वाहन म्हणून बाजारात विक्रीस आली आहे. अशा प्रकारची चारचाकी रिक्षा ही देशातली पहिली सेवा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com