बालक अपहरणप्रकरणी चार महिलांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

गोव्यातील कुटुंबाला अडीच लाखांना विक्री
मुंबई - दीड वर्षाच्या बालकाच्या अपहरणप्रकरणी चार महिलांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली. योगिता साळे, आशा ठाकूर, नूरजहॉं मुल्ला, प्रभावती नाईक अशी त्यांची नावे आहेत. योगिताने हा अपहरणाचा कट रचला होता. या बालकाला त्यांनी गोव्यातील एका कुटुंबाला अडीच लाखांना विकले होते.

मानखुर्दमधील या बालाकाचे अपहरण करण्यात आले होते. योगिता डिसेंबरमध्ये मानखुर्द येथे आईकडे राहण्यास आली होती. तिला पैशांची गरज होती. तिने बालकाच्या अपहरणाचा कट रचला. योगिताने आशाला फोन करून माहिती दिली. गोव्यातील एका कुटुंबाला मुलगा हवा आहे, असे आशाने योगिताला सांगितले. पाच डिसेंबरला योगिताने या बालकाला पळवून नेले. याविषयी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

परिमंडळ सहाचे उपायुक्त शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तांत्रिक माहितीनुसार पोलिसांनी योगिताला ताब्यात घेतले. चौकशीत तिने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. बालकाला घेऊन ती गोव्याला गेल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. कसून चौकशी केल्यावर तिने आशा ठाकूरच्या मदतीने या बालकाला अडीच लाखांना विकल्याचे सांगितले. आशाच्या चौकशीत नूरजहॉं शेख आणि प्रभावती नाईक यांची नावे समजली. त्या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. गोवा येथून पोलिसांनी या बालकाची सुटका केली. चारही महिलांना उद्या (ता. 13) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: Four women were arrested for child kidnapping