चार वर्षाच्या चिमुरडीची निर्घृण हत्या; शरीराचे केले दोन तुकडे

girl.jpg
girl.jpg

खोपोली : खोपोली शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना बुधवारी सकाळी समोर आल्याने सर्वांचा थरकापच उडाला. शिळफाटा पटेलनगर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील चार वर्षांची चिमुरडी मंगळवार (ता.12) सकाळी 10 वाजल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली. काल पासून परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन शोध सुरू असताना बुधवारी सकाळी घराच्या काही अंतरावर एका बंगल्याच्या मागील झुडपात सदर मुलीचे धड आढळून आल्याने सारेच चक्रावले. त्यानंतर काही वेळाने बोरघाटात उतरण जवळ मुंबई पुणे जुन्या महामार्गा शेजारी एक गॅरेज समोर या मुलीचे डोके आढळून आल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ खोपोली पोलीस यंत्रणा दाखल होऊन मागोवा घेतला असता, या मुलीची आई मूकबधीर असल्याने खाणाखुणा वरून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, शिळफाटा पटेल नगर येथे परराज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी चालक असणारा धर्मसिंग आपली पत्नी पुष्पा व तीन लहान मुले सह सहा महिन्यापासून वास्तव्य करीत आहे. 12 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून त्यांची मोठी मुलगी आशा (वय 4 वर्ष) ही बेपत्ता झाली होती. आई वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळच्या दरम्यान मुलगी न मिळाल्याने   शेजारी लोकांनी चौकशी करून रात्री उशिरा पर्यत शोध घेतला. मात्र तरी मुलगी मिळाली नाही. नंतर या बाबत खोपोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरु केली असता. सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान आशाच्या शरीराचा धड येथील बंगल्याच्या मागील बाजूस आमराई मध्ये झुडपात आढळून आले. त्यानंतर या मुलीचे डोके काही अंतरावर असणाऱ्या जुना महामार्ग लगत एका गॅरेज समोर आढळून आल्याने खळबळ उडाली. 

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ रंजित पाटील, खोपोली पोलीस निरीक्षक के.एस.हेगाजे यांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन पाहणी करीत असताना, मृत आशाच्या मूकबधीर आईने त्या इशाऱ्याने  एका व्यक्ती वर  संशय व्यक्त केला. सदर मुलगी नेहमी या व्यक्तीकडे जात होती त्यामुळे हे कृत्य त्यांनीच केले असावे असा आरोप केल्याने,  पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. खबरदारी म्हणून कमांडो पथकासह पोलीस तैनात करण्यात आले असून,  तपासाची चक्रे जलद गतीने सुरु करून श्वानपथक ही कार्यरत आहेत. मात्र या खुनाचे गुड अद्याप गुलदस्त्यातच आहे. या मयत चिमुरडीच्या शरीराच्या धडावर भाजल्याचे चटके दिल्याच्या खुण असल्याचे समोर आल्याने हे कृत्य अघोरी नरबळी तर नाही या बाबतीत ही तपास सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com