मुंबई : दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना चार तरुण बुडाले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

येथील मांडा पश्चिम भागातील जानकी विद्यालय परिसरात असलेल्या ओमकारेश्वर सदन चाळ या ठिकाणी राहणारे चार तरुण दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना वाहून गेल्याची दुर्दैवी घटना काल रात्री १२:३० च्या दरम्यान घडली. 

टिटवाळा : येथील मांडा पश्चिम भागातील जानकी विद्यालय परिसरात असलेल्या ओमकारेश्वर सदन चाळ या ठिकाणी राहणारे चार तरुण दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना वाहून गेल्याची दुर्दैवी घटना काल रात्री १२:३० च्या दरम्यान घडली. 

काल रात्री १२ ते १२.३० च्या दरम्यान ओंकारेश्वर मित्रमंडळ हे आपल्या नवरात्रौउत्सवात बसवलेल्या दुर्गामातेच्या मुर्तीच्या विसर्जनासाठी येथील वासुंद्री उतरले असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मूर्ती त्यांच्या अंगावर आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले.

दरम्यान, रुपेश पवार (२३), विश्वास पवार (२४) हे दोघे सख्ये भाऊ तसेच . सिदेश पार्टे (२४), सुमीत वायदंडे (२५) अशी या चार युवकांची नावे आहेत. याबाबत तत्काळ टिटवाळा पोलिसांना कळविण्यात आले.

मध्यरात्री उशिरापर्यंत स्थानिक लोक व पोलीस यांच्या शोधकार्य चालू होते. मात्र अद्याप त्यांचा शोध लागला नाही. अग्निशमनदलाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि स्थानिक तरुण यांनी आज सकाळी पुन्हा शोधकार्य चालू केले आहे. सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे .

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four young men drown while immersing Durga mother idol