अकरावी प्रवेशाची आज चौथी यादी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

मुंबई - अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत तीन गुणवत्ता यादी जाहीर होऊनही प्रवेश न मिळालेल्या 1 हजार 43 विद्यार्थ्यांसाठी व तिन्ही यादीत बेटरमेंटची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी (ता. 18) चौथी यादी जाहीर होणार आहे. 

अकरावी प्रवेशासाठी एकूण 2 लाख 69 हजार 172 जागा होत्या. या जागांवर प्रवेशासाठी 2 लाख 17 हजार 832 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार 77 हजार 26, दुसऱ्या यादीत 2 हजार 887 आणि तिसऱ्या यादीनुसार 16 हजार 601 असे मिळून एकूण 1 लाख 16 हजार 514 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. आरक्षित जागांवर सुमारे 35 हजार प्रवेश झाले आहेत. मिळालेले गुण आणि त्यांनी नोंदविलेले कॉलेज पसंतीक्रम यात फरक असल्याने 1 हजार 228 विद्यार्थी प्रवेशापासून तिसऱ्या यादीत वंचित राहिले आहेत. यापैकी 185 विद्यार्थ्यांनी आरक्षित जागांवर प्रवेश घेतल्याचे तपशील एमकेसीएलकडे आहेत. उर्वरित 1,043 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने चौथ्या यादीचा पर्याय निवडला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशअर्ज भरला आहे; पण अद्याप प्रवेश मिळालेला नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी एकदाही मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांनाही या यादीत प्रवेश देण्यात येईल.

Web Title: fourth list for FYJC admission to out today

टॅग्स